Skip to content

Home / Blog / Grammar

Tenses सोप्या मराठीत — फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा

By Pallavi Ma'am · 3 August 2026 · 5 min read

Tenses सोप्या मराठीत — फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा

बारा Tenses पाठ करायची गरज नाही. रोजच्या बोलण्यात तीनच लागतात. ते नीट आले की बाकीचे आपोआप जमतात.

Tenses ची भीती बहुतेक वेळा शाळेतून येते — बारा नावं, तक्ते, आणि काहीच न समजणं. पण रोज बोलताना तुम्हाला तीनच लागतात.

1. रोज घडणारं — Simple Present

I go to office at nine. रोजची सवय, नेहमीची गोष्ट. चूक इथे होते: “I am going to office at nine daily” — नाही. रोजच्या सवयीला am going लागत नाही.

2. आता घडत असलेलं — Present Continuous

I am going to the bank now. या क्षणी चालू आहे. इथे एक मोठी चूक: “I am having a car”. मालकी असणं हे चालू नसतं — I have a car.

3. संपलेलं — Simple Past

Yesterday I went to Pune. वेळ सांगितली आणि गोष्ट संपली, तर Simple Past. “Yesterday I have gone” असं होत नाही — वेळ सांगितली की have जातो.

एक सोपी चाचणी

वाक्य बोलण्यापूर्वी स्वतःला विचारा: ही गोष्ट रोजची आहे, आत्ताची आहे, की संपलेली आहे? उत्तर मिळालं की Tense आपोआप ठरतो. तक्ता लागत नाही.

अशा वीस चुका आणि त्यांची दुरुस्ती या लेखात आहे. आणि सराव करायचा असेल तर Practice Session मध्ये प्रश्न सोडवा.

Reading is a good start. Speaking is the point.

Take the free ten-question level test and find out exactly where to begin.

Start a practice session
Ask Pallavi Ma'am