Skip to content

Home / Blog / Confidence

फोनवर इंग्रजीत बोलायची भीती जाते कशी?

By Pallavi Ma'am · 31 July 2026 · 5 min read

फोनवर इंग्रजीत बोलायची भीती जाते कशी?

समोरचा दिसत नाही, म्हणून फोन सगळ्यात कठीण वाटतो. यावर तयारी हा एकच उपाय आहे — आणि ती तयारी छोटी असते.

समोरासमोर बोलताना हातवारे, चेहरा, हसू — सगळं मदत करतं. फोनवर फक्त आवाज असतो. म्हणूनच बरेच लोक म्हणतात, “बोलता येतं, पण फोनवर अडतं.”

सुरुवात ठरवून ठेवा

पहिली दहा सेकंद ठरलेली असतील तर पुढचं सोपं होतं:

  • Hello, this is Sunita calling from Nashik.
  • Am I speaking to Mr. Sharma?
  • Is this a good time to talk?

ऐकू आलं नाही तर मागायला लाजू नका

हे कमजोरीचं लक्षण नाही — इंग्रजी पहिली भाषा असलेले लोकही हे रोज म्हणतात:

  • Sorry, the line is not clear. Could you say that again?
  • Could you speak a little slower, please?
  • Let me repeat that back to you, just to be sure.

शेवट नीट करा

  • So I will send you the details by evening. Is that fine?
  • Thank you for your time. Have a good day.

सराव कसा करायचा

स्वतःला फोन करा आणि voice recording करा. दोन आठवडे रोज दोन मिनिटं. स्वतःचा आवाज ऐकणं सुरुवातीला विचित्र वाटतं, पण सुधारणा सगळ्यात वेगाने इथेच होते.

Class मध्ये आम्ही हे जोडीने करतो — एकजण customer, एकजण receiver. कोर्स बघा, किंवा शंका असेल तर विचारा.

Reading is a good start. Speaking is the point.

Take the free ten-question level test and find out exactly where to begin.

Start a practice session
Ask Pallavi Ma'am