बोलताना मनात काय होतं ते बघा: आधी मराठी वाक्य तयार होतं, मग त्याचं इंग्रजी शोधलं जातं, मग Grammar तपासलं जातं, आणि मग तोंड उघडतं. तीन पायऱ्या जास्त. म्हणून वेळ लागतो.
शब्द नको, वाक्यं पाठ करा
शब्दसंग्रह वाढवला की वाक्य जुळवायचं काम राहतंच. पूर्ण वाक्य पाठ असेल तर जुळवायचं काहीच नाही. म्हणूनच आमच्या Class मध्ये शब्दांच्या याद्या दिल्या जात नाहीत — वाक्यं दिली जातात.
Chunks मध्ये विचार करा
“I would like to…”, “Could you please…”, “I am not sure but…” — हे तुकडे एकाच शब्दासारखे लक्षात ठेवा. मग पुढे फक्त एक शब्द बदलावा लागतो.
दिवसाची पाच मिनिटं फक्त इंग्रजीत विचार करा
आंघोळ करताना, चालताना — जे दिसतं ते इंग्रजीत मनात म्हणा. चुकीचं म्हणालात तरी चालेल. उद्देश अचूकता नाही, सवय आहे.
चूक झाली तरी वाक्य पूर्ण करा
मधेच थांबून दुरुस्त करणं म्हणजे मेंदूला “थांबणं ठीक आहे” असं शिकवणं. वाक्य संपवा, मग दुरुस्त करा. Fluency आधी, accuracy नंतर.
याच्या पुढची पायरी म्हणजे रोज कोणाशी तरी बोलणं. Live Class मध्ये तेच होतं — प्रत्येक वर्गात तुम्ही बोलता.