Skip to content

Home / Blog / Marathi

इंग्रजी बोलायला किती वेळ लागतो? — खरं उत्तर

By Pallavi Ma'am · 13 July 2026 · 5 min read

इंग्रजी बोलायला किती वेळ लागतो? — खरं उत्तर

तीस दिवसांत fluent होण्याचं आश्वासन कोणी देत असेल तर ते खोटं आहे. खरा आकडा वेगळा आहे, आणि तो कमीही आहे.

हा प्रश्न सगळ्यात जास्त विचारला जातो, आणि त्याचं प्रामाणिक उत्तर कोणी देत नाही. म्हणून इथे देतो.

रोज बोलण्याचा सराव असेल तर

  • 3 ते 4 आठवडे — ओळखीच्या परिस्थितीत अडखळत, पण बोलता येईल. दुकान, फोन, ओळख करून देणं.
  • 2 ते 3 महिने — Office चं रोजचं काम इंग्रजीत होईल. Meeting मध्ये मुद्दा मांडता येईल.
  • 6 महिने — विचार न करता बोलता येईल. भाषांतर थांबेल.

पण एक अट आहे

हे आकडे रोज बोलण्याच्या सरावावर आहेत. फक्त ऐकून किंवा वाचून हे होत नाही. आठवड्यातून एकदा एक तास Class आणि बाकी काहीच नाही — असं असेल तर वेळ तीनपट लागेल.

दिवसाला किती वेळ पुरतो?

वीस मिनिटं. पण रोज. दोन तास आठवड्यातून एकदा यापेक्षा वीस मिनिटं रोज खूप जास्त काम करतं — भाषा ही सवय आहे, माहिती नाही.

तुम्ही कुठे आहात हे आधी बघा

बरेच लोक स्वतःला वाटतं त्यापेक्षा पुढे असतात. Practice Session मध्ये दहा प्रश्न सोडवा — पैसे भरायची गरज नाही, आणि तुमची खरी पातळी कळेल. तिथून योग्य कोर्स निवडणं सोपं जाईल.

Reading is a good start. Speaking is the point.

Take the free ten-question level test and find out exactly where to begin.

Start a practice session
Ask Pallavi Ma'am