Skip to content
Diwali Dhamaka — up to 62% OFF on courses · Learn spoken English through Marathi Ends in --d --:--:-- See Diwali offers →

Home / Blog / Vocabulary

रोजच्या वापरातील 50 English शब्द — मराठी अर्थासह

By Pallavi Spoken English Classes · 5 November 2026 · 5 min read

रोजच्या वापरातील 50 English शब्द — मराठी अर्थासह

घर, खाणं, बाजार, प्रवास आणि वेळ — रोज लागणारे 50 सोपे English शब्द मराठी अर्थासह, आणि ते वाक्यात वापरण्याची युक्ती.

English बोलायला हजारो शब्दांची गरज नसते. रोजच्या जीवनात वारंवार येणारे थोडे शब्द नीट येतात, तर बोलणं सुरू होतं. हे घ्या 50 शब्द — मराठी अर्थासह.

EnglishमराठीEnglishमराठी
houseघरfamilyकुटुंब
motherआईfatherवडील
brotherभाऊsisterबहीण
friendमित्र / मैत्रीणneighbourशेजारी
childमूलguestपाहुणा
waterपाणीmilkदूध
teaचहाriceभात
breadपाव / ब्रेडvegetableभाजी
fruitफळsaltमीठ
sugarसाखरoilतेल
marketबाजारshopदुकान
bankबँकschoolशाळा
officeकार्यालयroadरस्ता
busबसtrainरेल्वे
ticketतिकीटphoneफोन
morningसकाळeveningसंध्याकाळ
todayआजtomorrowउद्या
yesterdayकालhappyआनंदी
tiredथकलेला / थकलेलीhungryभुकेलेला / भुकेलेली
busyव्यस्तreadyतयार
earlyलवकरlateउशीर
nearजवळfarलांब
cheapस्वस्तcostlyमहाग
easyसोपंdifficultअवघड
importantमहत्त्वाचंfreeमोकळा / मोफत

शब्द वाक्यात वापरा

फक्त शब्द पाठ करू नका — प्रत्येक शब्दाचं एक वाक्य बनवा:

  • market — I go to the market in the evening.
  • busy — I am busy today. I will call you tomorrow.
  • costly — This vegetable is costly. Do you have something cheap?

रोज फक्त 5 शब्द

रोज 5 शब्द घ्या, प्रत्येकाचं तुमच्या स्वतःच्या आयुष्यातलं वाक्य बोला. 10 दिवसांत 50 शब्द तुमच्या बोलण्यात येतील — पाठ न करता.

याहून जास्त शब्द हवे असतील तर Rapid Spoken English Mastery Course सोबत येणारं “2000+ English Vocabulary” eBook पाहा — प्रत्येक शब्दाचा मराठी अर्थ त्यात आहे.

पुढचं पाऊल

फक्त वाचून बोलणं येत नाही — बोलून पाहावं लागतं. मराठीतून Spoken English Course मध्ये हेच सगळं रोजच्या सरावासह शिकवलं जातं. आधी मोफत Live Demo पाहा, आणि रोज एक Daily Dose किंवा Practice Test सोडवा.

Reading is a good start. Speaking is the point.

Take the free ten-question level test and find out exactly where to begin.

Start a practice session
Ask Pallavi Ma'am